शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने सोमवारी संसदेवर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यापासून राजधानी दिल्लीतील वातावरण तापलेलं आहे. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाची धग कायम असतानाच आज दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाजवळ काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या काही खासदारांची धरपकड केली आहे.
बातमी शेअर करा

