परळी वैजनाथ दि.१९(प्रतीनिधी):शहरातील पेठ मोहल्ला परिसरात सखोल मतदार यादी पुर्ननिरीक्षण मोहिमेचे काम करत असताना एका शिक्षकाला शुक्रवार (दि.१७)रोजी मारहाण करण्यात आली असून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेफूज जाकीर शेख (वय ४२), व्यवसाय- शिक्षक, रा.मलिकपूरा, परळी वैजनाथ हे शुक्रवार (दि.१७) रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता पेठ मोहल्ला परिसरातील अब्दुल हमीद शादीखाना येथे एसआयआर मोहिमेचे शासकीय कर्तव्य बजावत असताना चार आरोपींनी संगनमत करून त्यांच्या हातातील शासकीय कामकाजाची कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.या प्रकरणी शेख शाकेर अहमद, शेख जुनेद, शेख शोएब (सर्व रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) तसेच आणखी अनोळखी व्यक्तीविरुद्ध शनिवार (दि.१८)रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोह.काळे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
