Advertisement

कंटेनरच्या धडकेत चिमुकली जागीच ठार

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

बीड-शहरातील बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन समोर शनिवारी (दि.१३) सकाळी ११.३० च्या दरम्यान एक कंटेनरने दिलेल्या धडकेत एका १० वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यु झाला असून या अपघातात तिचे आजोबा जखमी झाले आहेत.अपघातानंतर घटनास्थळी शिवाजी नगर पोलिसांनी धाव घेतली होती. 
                    किमया अमर देशमुख (वय-१० रा.बीड) ही आपल्या आजोबांसोबत बार्शी रोडवरून स्कुटीवरून जात असताना कंटेनर (क्र.एम.एच.१२ एलटी ८१४३) ने जोराची पाठीमागून धडक दिली.यात किमयाचा जागीच मृत्यु झाला.तर तिचे आजोबा या अपघातात जखमी झाले.त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किमयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

Advertisement

Advertisement