Advertisement

मांजरसुंबा-केज महामार्गावर अपघात

प्रजापत्र | Thursday, 09/07/2026
बातमी शेअर करा

बीड दि.९(प्रतिनिधी):  मांजरसुंबा-केज महामार्गावर गवारी फाटा येथे कंटेनर आणि चारचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरवार (दि.९) रोजी पहाटे घडली सुदैविने यामध्ये जिवीतहनी टळली.
   बीड जिल्ह्यात सध्या रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हे वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे. आज गुरुवारी पाहटे ५ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि चारचाकी वाहनाची धडक होऊन अपघात घडला आहे. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन पडली आहेत. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. सुदैवाने या घटनेत जिवीतहनी टळली असून, वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

 

Advertisement

Advertisement