Advertisement

 शुल्लक कारणावरून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

प्रजापत्र | Thursday, 28/05/2026
बातमी शेअर करा

 गेवराई दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील आम्ले वाहेगाव येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२८) रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात शेख दिलावर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 मिळालेल्या माहितीनुसार, शेख दिलावर हे सकाळी ७:३० च्या सुमारास धार्मिक विधीसाठी जात असताना त्यांच्यावर अचानक गावातीलच लोकांनी हुज्जत घालत   मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींकडून लाठ्या-काठ्या तसेच लोखंडी गजाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मारहाण सुरू असताना शेख दिलावर यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी व मुलगा घटनास्थळी आले असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यात शेख दिलावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Advertisement

Advertisement