Advertisement

  अन ठाकरे सरकारने भगतसिंह कोश्यारींची ती परवानगी नाकारली

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

महाराष्ट्र -महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता आखणी वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारने राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानी नाकरली आहे. हवाई प्रवासाला परवानगी नाकारल्याने राज्यपालांना राजभवनात परतावे लागले. विशेष म्हणजे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विमानात बसल्यावर परवानगी नाकारल्याचे कळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी निघाले होते. यासाठी ते सरकारी विमानाने निघाले होते. पण, राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले. राज्यपालांना परवानगी नसल्याचे विमानात बसल्यावर समजले. यानंतर राज्यपालांना राजभवनात परतावे लागले. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

सरकारने माफी मागावी

दरम्यान, राज्यपालांना सरकारने परवानगी नाकारल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांची सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारकडून असे घडले असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा.

 

 

Advertisement

Advertisement