Advertisement

स्कॉर्पियो -रिक्षाच्या अपघातात तिघे जखमी 

प्रजापत्र | Monday, 18/05/2026
बातमी शेअर करा

 केज  -रस्त्याच्या कडेला उभी जीप अचानक आडवी घेतल्याने रिक्षा स्कॉर्पियोला धडकल्याने या अपघातात रिक्षामधील तिघे जखमी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला पाठविण्यात आले आहे. 

         केजहुन गणेश वासुदेव कोळी, रसूल गुलाब शेख, चाँद शेख हे तिघे रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रिक्षाने कळंबला निघाले होते. रिक्षा केज – कळंब रस्त्यावरील कमल पेट्रोलसमोर आला होता. याचवेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली स्कॉर्पियो (एम. एच. ४४ एई ७४७८) अचानक चालकाने पेट्रोल पंपाकडे वळवीत आडवी केल्याने रिक्षा जीपला धडकला. या झालेल्या अपघातात गणेश वासुदेव कोळी, रसूल गुलाब शेख, चाँद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्कॉर्पियो चालक व जीपमधील लोक पसार झाले. या जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार जास्त लागल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement