Advertisement

केज शहरातील नामांकित व्यापारी पैठणकर यांचे मॉर्निंग वॉक दरम्यान निधन

प्रजापत्र | Wednesday, 10/02/2021
बातमी शेअर करा
केज दि.१०  शहरातील गुरुकृपा कृषी  सेवा केंद्राचे संचालक तथा रोटेरियन संजय किसनराव पैठणकर यांचे आज सकाळी साडेसहा वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.        बुधवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेले असताना विठाईपुरम (कळंब रोड) येथे त्यांना चक्कर आली म्हणून ते खाली बसले व त्याच क्षणी त्यांची प्राणज्योत मालवली. पैठणकर यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. केज शहरातील अत्यंत संयमी, हुशार व कर्तृत्वान व्यापारी म्हणून ते परिचित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ केज चे सक्रिय सदस्य होते.
त्यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

Advertisement

Advertisement