बीड-जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस आकडा वाढत असून रविवारी (दि.५) जिल्ह्यातून २४८ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली असून बीडमधून ८७,अंबाजोगाई ४८,परळी ५० केज २८,गेवराई १९,आष्टीमधून १६ स्वॅब तपासणीसाठी गेले आहेत.रात्रीपर्यंत यांचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
बातमी शेअर करा