बीड दि.२६ (प्रतिनिधी): बर्दापुर येथुन अंबाजोगाईकडे येणाऱ्या ईनोव्हा कारमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ५ लाख २६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल बुधवार (दि.२६) रोजी पहाटे ५ वाजता जप्त केला.
सविस्तर माहिती अशी की, बर्दापुर येथुन अंबाजोगाईकडे गुटखा भरून एक पांढऱ्या रंगाची ईनोव्हा क्रिस्टा कार येत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीवरून सेलुअंबा रोडवर असलेल्या टोल नाक्यावर पांढऱ्या रंगाची ईनोव्हा क्रिस्टा कार जिचा नंबर एमएच १४ जीयु ०६९९ असा होता तिला थांबविण्यात आले व चालकास माहिती विचारण्यात आली. चालक फारोख हमीद सय्यद (वय ४५ रा. सय्यद गल्ली माजलगाव) याने माहिती दिली. यावेळी वाहनाची झडती घेतली असता ५ लाख २६ हजार २०० रूपयाचा गुटखा व इनोव्हा क्रिस्टा कार असा एकुण २५ लाख २६ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल बुधवार (दि.२६) रोजी पहाटे ५ वाजता जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे केकाण, गित्ते, पोना भताणे, पो अं अंधळे आदींनी केली.

बातमी शेअर करा
