लातूर दि.५ - रात्र झाली, गावाकडे जाण्यासाठी वाहन नाही, मग करायचे काय.....? या विचारात असलेल्या चार मद्यपींनी काल रात्री चक्क राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीलाच गावाकडे घेऊन जाण्याचा विचार केला अन ती पळवली सुद्धा...! हा धक्कादायक आणि हास्यास्पद प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडला आहे.
चार मद्यपी एकत्र आले अन रात्री उशिरापर्यंत ग्लासला ग्लास लावत बसले त्यात किती उशीर झाला हे कळालेच नाही. अन जेंव्हा गावाकडे जाण्यासाठी औराद शहाजनीच्या बसस्थानकात आले तेंव्हा सर्व गाड्या निघून गेल्या होत्या. मग करायचे काय? तेवढ्यात बसस्थानकात निलंगा औराद शहाजनी ही मुक्कामी गाडी उभी असलेली दिसली अन मग काय चंद्रावर गेलेल्या मद्यपींनी आपला मोर्चा बसकडे वळवत मारला सेल्फ आणि निघाले गावाकडे. मात्र अगोदरच नशेच्या अमलाखाली असलेल्या चौघांनी रस्त्यात असलेल्या दोन विजेचे पोलही भुईसपाट केले मात्र गाडी उभी केली नाही.
दरम्यान मध्यरात्री जेंव्हा सदरील बसच्या चालकाला जेंव्हा आली अन तो बाहेर आला असता बस जाग्यावर नव्हती. घाबरलेल्या बस चालकाने पोलिसांना सदर प्रकारची माहिती देताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी शोध घेतला असता सदरील बस निलंगा तालुक्यातील शेळकी येथे आढळून आली, मात्र बस पळवणाऱ्यानी धूम ठोकली होती.
''जँहा चार यार मिल जाये वंही रात गुजर जाये''...…..असे म्हणतात मात्र यांनी याला छेद देत चक्क बसच पळवत घर जवळ करण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे चर्चा तर होणारच.….....!
बातमी शेअर करा