पुणे-'ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा'... झपाटलेला फिल्मध्ये तात्या विंचूला असा विचित्र मृत्यूंजय मंत्र देणारा बाबा चमत्कारनं जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राघवेंद्र कडकोळ यांची तीन दशकं मराठी नाटक-चित्रपट, मालिकातून त्यांनी दमदार अभिनय केला. कर्नाटकी हेल काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला अधिक आल्या. ‘झपाटलेला’ चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका गाजली. याशिवाय ‘पळवापळवी’, ‘वाजवू का’ चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत कडकोळ यांची केमिस्ट्री भन्नाट जमली होती. ‘पंढरीची वारी’ चित्रपटातील राजा गोसावी, कडकोळ अण्णांची जुगलबंदी अविस्मरणीय होती.
बालगंधर्व परिवारातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे नटवर्य केशवराव दाते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं.
बातमी शेअर करा