Advertisement

मुंडे भगिनी उद्या गहिनीनाथ गडावर

प्रजापत्र | Thursday, 04/02/2021
बातमी शेअर करा

बीड-भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे उद्या शुक्रवारी गहिनीनाथ गडावर येणार आहेत. थोर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्या उपस्थित राहणार आहेत.
वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उद्या गहिनीनाथ गडावर होत आहे, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीला गडावर येण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची परंपरा पंकजा  मुंडे यांनी देखील पुढे जोपासली असून दरवर्षी त्या  दर्शनासाठी गडावर येतात.  एक भक्त म्हणून गडावर विविध विकास कामासाठी त्यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी दिला होता. उद्या सकाळी 11 वाजता  पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितम  मुंडे यांचे गडावर आगमन होणार असून दर्शन व किर्तनाच्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement