Advertisement

 गंभीर आरोपावर धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा

प्रजापत्र | Wednesday, 03/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई, 3 फेब्रुवारी : करूणा शर्मा  यांनी फेसबुक पोस्ट लिहित पुन्हा गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

'आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून मा . उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केलं आहे. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे,' अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मुलांच्या ताब्यावरून आरोप, धनंजय मुंडेंचं नेमकं म्हणणं काय आहे?

"विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे.

Advertisement

Advertisement