Advertisement

घरकुलासाठी मागितली लाच

प्रजापत्र | Friday, 19/09/2025
बातमी शेअर करा

केज दि.१९(प्रतिनिधी): पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे 'बे बाकी' प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

एका ३५ वर्षीय पुरुषाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. ठोंबरे यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ह हजार रूपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्त म्हणून दोन हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. १९ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीने केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रूपये घेताच त्याला पथकासमोर रंगेहाथ पकडण्यात आले.

Advertisement

Advertisement