बीड-परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी गल्लीमधील एका घरातून अंबाजोगाईचे डीवायएसपी ऋषिकेश शिंदे यांनी छापा मारत गांज्याचा मोठा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कारवाईत तब्बल ४० किलो गांजा आतापर्यंत पोलिसांनी मोजणी केला असून तो क्विंटलच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
परळी शहारतील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्लीमध्ये एका घरात गांजा असल्याची माहिती अंबाजोगाई डीवायएसपी ऋषिकेश शिंदे व पोलिसांच्या टीमला मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी छापा मारून ही मोठी कारवाई केली आहे. यात क्विंटलच्या घरात पोलिसांना गांजा मिळणार असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत ४० किलो गांज्याची मोजणी पूर्ण झाली असून आणखीन काही काळ ही मोजणी सुरु राहिलं अशी माहिती आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात असून अजून कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून परळी शहारत गांज्याचे मोठे रॅकेट सक्रिय होते का याचाही तपास पोलीस करणार आहेत.

बातमी शेअर करा