केज दि.८ (प्रतिनिधी):केज (Kaij) ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून अशोक लिलॅन्ड कंपनीच्या ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच छापा मारून मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत (Crime)एक कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
रईसोधीन अमीरोद्यीन शेख (वय ५० वर्षे रा.मिल्लतनगर ओकाला रोड ता.जि. रतलाम, राज्य मध्यप्रदेश) व परशुराम मोहन गायकवाड (रा.एकनाथ वाडी ता.पाथर्डी जि अहिल्यानगर हमु. बीड) (Beed)या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जालिमसिंग (रा.बेहरामपुर,पुर्ण नाव माहीत नाही) रुपेश मालपाणी (रा.कळंब जि.धाराशिव) (Kaij) दोघे फरार आहेत.ट्रक चालक रईसोधीन अमीरोद्यीन शेख,परशुराम गायकवाड बेकायदेशीररित्या, महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला असताना राजनिवास पान मसाला, राजनिवास पान मसाला तंबाखु, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला तंबाखु चा माल चोरटी विक्री करण्याकरीता ट्रकमध्ये (एम. एच.डीडीओ १ एस.९४४२) घेवुन जात असताना केज ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून पोलिसांनी (Crime)ताब्यात घेतला. यावेळी ७४ लाख ७२ हजारांचा गुटखा व २७ लाखांचा टेम्पो असा १ कोटी १ लाख, ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मांजरमे हे करत आहेत.