Advertisement

रेशन कार्ड आणि शिक्षणासंदर्भात 'हा' घेतला निर्णय

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

३२ राज्यात एक देश एक रेशन कार्ड
दिल्ली : स्थलांतरित कामगारांना सुविधा व्हावी यासाठी देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक देश एक रेशनकार्ड योजना राबविण्यात येणार आहे. यातून ६९ कोटी लोकांना फायदा होईल . कामगार त्याच्या रेशन कार्डवर देशाच्या कोणत्याही भागातून रेशन घेऊ शकेल असेही सीतारामन यांनी म्हटले आहे. 

 

राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करणार
दिल्ली : नव्या शिक्षण धोरणानुसार देशात सर्व शिक्षण संस्थांना एका छत्री खाली आणण्यासाठी एक राष्ट्रीय उच्चशिक्षण आयोग स्थापन केला जाईल . त्यासाठीचे विधेयक या वर्षी आणण्यात येईल अशी घोषणा सीतारामन यांनी केली. तसेच देशात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नवीन १०० सैनिकी शाळा सुरु केल्या जातील असे त्या म्हणाल्या . जपान आणि युएई सोबत शिक्षणाचे नवे करार केले जातील असेही त्यांनी सांगितले. 

 

Advertisement

Advertisement