आणखी ७ कंपन्या विकणार,बँकांचेही खाजगीकरण, एलआयसीच्या आयपीओ निघणार
दिल्ली: अपेक्षेप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचे प्रस्तावित केले आहे. भारत पेट्रोलियम सह आयडीबीआय बँक, शिपिंग कॉर्पोरेशन , पवनहंस अशा कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील २ बँकांचे खांजगीकरण केले जाणार आहे. तसेच आगामी वर्षात एलआयसीच्या मोठा आयपीओ निघणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. यासाठीचे विधेयक येत्या अधिवेशनात आणले जाईल असेही सीतारामन म्हणाल्या . यामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कमी होणार आहेत.
अडचणीतल्या बँकांसाठी २० हजार कोटी
दिल्ली -मागील काही काळात देशातील अनेक बँक अडचणीतआल्या आहेत. बँकांचा एनपीए वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तब्बल २० हजार कोटीच्या पुनर्भांडवलाचा बुस्टर डॉस देण्यात येणार आहे.