Advertisement

ट्रक दुचाकीच्या अपघातात एक ठार 

प्रजापत्र | Tuesday, 10/06/2025
बातमी शेअर करा

केज दि.१०(प्रतिनिधी): अंधारात (Accident)जळालेली बस न दिसल्याने दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडताच आलेल्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यु (Kaij)झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावर चिंचोली फाट्यापासून जवळ घडली.

         केजहून कळंबकडे निघालेली एसटी बस (एम. एच. ११ बीएल ९३७५) ही ९ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास(Kaij) केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटीजवळ असलेल्या शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ अचानक पटल्यानंतर जळालेल्या अवस्थेत अंधारात रस्त्यावर उभी होती.याचवेळी गणेश कल्याण हाके व अशोक बबन हाके (रा. माळेवाडी ता. केज) हे दोघे केजकडून साळेगावकडे दुचाकीवर (एम. एच. ४४ एबी ६२३४) जात असताना ही जळालेली बस अंधारात (Accident)न दिसल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी पडली. यावेळी कळंबकडून केजकडे जात असलेल्या एका अवजड ट्रकने (एम. एच. १० एस. ७९१६) त्यांच्या दुचाकीला १०० ते १५० फूट फरफट नेले.या अपघातात गणेश हाके व अशोक हाके हे दोघे गंभीर झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता अशोक बबन हाके यांचा मृत्यु झाला. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी दिली.

Advertisement

Advertisement