मुंबई-वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी आणि तुम्ही अडचणीत याल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. माळेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी अजित पवारांनी शेतीपंपाच्या थकीत वीजबिलावर भाष्य केले. 'सरकारने शेतीपंपासाठी निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरू केली आहे, त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली वीजबिले भरावीत, असेही पवार म्हणाले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाचे निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरू केली आहे. महावितरण कंपनीला तब्बल 40 हजार कोटी रुपये येणे आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी तात्काळ निम्मे वीजबिल भरुन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. अन्यथा महावितरण कंपनीला नाईलाजास्तव वीज तोडावी लागेल,' असे आवाहन अजित पवारांनी केले.
बातमी शेअर करा