Advertisement

वैद्यनाथ मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपातच शिजवले मांसाहारी अन्न

प्रजापत्र | Sunday, 01/06/2025
बातमी शेअर करा

  परळी वैजनाथ दि.१ (प्रतीनिधी ) : वैद्यनाथ मंदिर (Parli Vaijnath) परिसरात एक धक्कादायक प्रकार (दि.३१) शनिवार रोजी रात्री समोर आला असून कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवले आहे.

                परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. मात्र (Vaijnath)वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर (दि.३१) शनिवार रोजी रात्री निदर्शनात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे.मंदिर परिसरात कामे करतांना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा वारंवार सुचना लोकप्रतिनिधी,मंञी देत असतात मात्र तरीही दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या (Parli Vaijnath)पायऱ्यांबाबत सबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते. आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच मांसाहार शिजवल्याचा प्रकार पुढे आला आहे.यावर परळी व परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत असुन सदरील कंञाटदार सातत्याने पुरातन ठेवा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो यावर आता पालकमंञी व प्रशासन काय कारवाई करणार याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement