Advertisement

रणजीत कासलेला दिल्लीतून अटक

प्रजापत्र | Sunday, 01/06/2025
बातमी शेअर करा

दिल्ली : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी (Ranjit Kasle) रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. रणजीत कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले असल्याची माहिती ही समोर आली आहे. 

Advertisement

Advertisement