Advertisement

वाळूची चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला

प्रजापत्र | Friday, 30/05/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.३०(प्रतिनिधी) तालुक्यातील (Georai) उक्कड पिंप्री येथील सिंदफणा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी (दि.२९) गुरुवार रोजी कारवाई करत ४,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध (Chaklamba Police) चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून गेवराई तालुक्यातील उक्कड पिंप्री येथील सिंदफणा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची वाहतूक करताना अज्ञात ट्रॅक्टर चालकावर चकलांबा पोलिसांनी(Chaklamba Police) (दि.२९) गुरुवार रोजी कारवाई केली. यात स्वराज ७४४ एफ इ कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्र.एमएच ४५ एफ  ४०१७ अंदाजे किंमत ४,००,००० रुपये व एक पिवळ्या व लाल रंगाची विना नंबरची लोखंडी ट्रॉली अंदाजे किंमत ५०,००० रुपये  व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ५,००० रुपये असा एकूण ४,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर जागीच सोडून चालक मालक पसार झाले. पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत 

Advertisement

Advertisement