Advertisement

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

प्रजापत्र | Wednesday, 21/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आज (दि.२१मे)पासून सुरू झाली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम आणि प्रवेश अर्ज ऑनलाइन भरता येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. (11th online Admission) संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून अनेकांचं लॉगिन होत नाहीय. तर काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढलाय. शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल, असं शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केलं आहे.  

Advertisement

Advertisement