Advertisement

कड्यात व्यापाऱ्याचे घर फोडले

प्रजापत्र | Monday, 21/04/2025
बातमी शेअर करा

 आष्टी दि.२१(प्रतिनिधी): तालुक्यातील (Ashti)कडा येथे अज्ञात चोरटयांनी (दि.२०) रविवार रोजी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,३२,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून चोरट्यांविरुद्ध आष्टी (Ashti police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     जिल्हाभरात (Beed)मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.अश्यातच आष्टी तालुक्यातील कडा आडत व्यायवसायिक दिलीप नेनसुखलाल बलदोडा (वय ५२) यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरटयांनी (दि.२०) रविवार रोजी मध्यरात्री तोडून(Crime) घरातील १० ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र अंदाजे किंमत ४०,००० रुपये , तीन ग्रॅमची अंगठी अंदाजे किंमत १२००० रुपये , २० ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट अंदाजे किंमत ८०००० रुपये व रोख रक्कम १,००,००० रुपये असा एकूण २,३२,००० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. 

Advertisement

Advertisement