केज तालुक्यात विशेष पथकाची मोठी कारवाई......! 20 जुगारऱ्यांवर गुन्हा दाखल
बीड दि.29 - केज तालुक्यातील केकतसारणी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गुरूवार (दि.२८) रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने एकूण सात लाख पन्नास हजार सत्तर रूपयांचे साहित्य जप्त करून वीस जुगार खेळणाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी सहा वाजता पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाभाऊ रामलिंगराव आकुसकर रा.आडस ता. केज, बाळासाहेब सिताराम राऊत रा.चिंचोलीमाळी, लहु घनशाम वाघमारे रा.आडस, किसन पांडुरंग जाधवर रा.रत्नापुर ता.कळंब, महादेव पांडुरंग मस्के रा.भिमनगर ता.केज, श्रीराम मधुकर केकाण रा.केकाणवाडी, अमोल रघुनाथ शेप रा. लाडेवडगाव, बालासाहेब सुखदेव गालफाडे रा.चिंचोली माळी, बाजीराव परीक्षीत अंडील रा.पाहाडीपारगाव ता.धारुर, सय्यदकलीम स.अहमद रा.अजीजपुरा केज, सिलवंत बळीराम शिंदे रा.लाडेवडगाव, सुरेश प्रल्हाद माने रा.ब्रम्हणपुर ता.बीड, संतोष कचरु येवले रा.मादळमोही ता.गेवराई, अरुण विठ्ठल माने रा.ब्रम्हणपुर ता.बीड, शेखकलीम नुर मोहम्मद रा.कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर, दिलीप दामोदर खरचन रा.आखेगाव ता.शेवगाव जि.अहमनगर, विष्णु पांडुंरग डोले रा.मराठा गल्ली ता.केज,गोरख रामराव वायबसे रा.कासारी ता.केज, अशोक शिवाजी उजगरे रा.आसरडोह ता.धारुर, चरणदास महादेव काळे रा.उमरतपारगाव ता.जि.बीड हे केज तालुक्यातील केकत सारणी शिवारातील रामधन करांडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना हा जुगार खेळताना आढळून आले.
यावेळी पथकाने घटनास्थळावून रोख एक लाख एक्केवीस हजार सत्तर रूपये, वाहणे-पाच लाख चाळीस हजार, मोबाईल संच अठ्याऐंशी हजार पाचशे असे एकूण सात लाख पन्नास हजार सत्तर रूपयाचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील तपास पोहे पी. व्ही. कांदे करीत आहेत.