अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या (Maharashtra kesari ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात झाली. त्यात पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले. मात्र, पंचाच्या निर्णयावर आपेक्ष घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्रा.विलास कथुरे यांच्या समितीने पंचाचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पंच नीतेश काबलिए यांच्यावर तीन वर्षांची बंद घातली.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने सोमवारी (दि.१४) रोजी निर्णय घेतला. (Ahilya Nagar) अहिल्यानगर शहरामध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये राज्य अजिंक्यपद व (Maharashtra kesari ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, पंचाच्या निर्णयाने ही स्पर्धा वादळी ठरली. गादी विभागात अंतिम कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. पहिल्या चाळीस सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला डाक मारून धोकादायक स्थितीमध्ये पकडून ठेवले. यावेळी गादीवर पंच नीतेश काबलिए होते. पंचांनी चितपट कुस्तीचा निकाल दिला. त्यामुळे मैदानावर प्रचंड गोंधळ झाला. पैलवान शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयावर नाराज होऊन त्याने पंचाना मारहाण केली. त्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून शिवराज राक्षे यावर शिस्तभंगाची कारवाई करीत तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.(Maharashtra kesari ) गादीवरील कुस्ती वादग्रस्त ठरल्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या चौकशी समितीने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्य कुस्तीगीर संघाला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये चुकीच्या निर्णयाचा ठपका आखाडा पंच नीतेश काबलिए यांच्यावर ठेवण्यात आला. कुस्तीमध्ये पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे समितीच्या लक्षात आले. समितीने १४ एप्रिल २०२५ रोजी पत्रक काढून पंच नीतेश काबलिए यांना तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना खुलासा करण्यासाठी सात दिवसांचा कालवधी देण्यात आला.