Advertisement

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बेवारस वाहनाचा लिलाव

प्रजापत्र | Sunday, 13/04/2025
बातमी शेअर करा

उदगीर दि.१३ (प्रतिनिधी) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने २८ बेवारस वाहनाचा लिलाव रविवार (दि.१३) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिली आहे. 

           गेल्या अनेक वर्षापासून बेवारस वाहने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पडून आहेत या वाहनाचे रजिस्ट्रेशन नंबर चेसी नंबर इंजिन नंबर यांच्या माहितीसह वर्तमानपत्रातून मालकांना पत्र पाठवूनही व यापूर्वी आव्हान करून देखील बेवारस वाहनांचा ताबा घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. लिलाव होण्यापूर्वी मूळ मालक कागदपत्र घेऊन आल्यास त्यांना वाहन दिले जाईल लिलावानंतर कुणाचीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी १००० रुपये अनामत रक्कम शॉप ॲक्ट लायसन्स आधार कार्ड व कागदपत्रासह ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात रविवार (दि.१३) एप्रिल रोजी सकाळी ११  वाजता हजर रहावे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्याशी या संपर्क क्रमांकावर 9850632424, 8263034004  संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement