केज दि.१२(प्रतिनिधी): माजलगाव येथील चौघे कारने तुळजापूर येथे दर्शनासाठी (Car Bus Accident)जाताना कार आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाल्याची घटना केज-कळंब(Kaij) रस्त्यावरील माळेगाव येथे (दि.१२) शनिवार रोजी रात्री २ च्या सुमारास घडली आहे.
हनुमंत चिंतामण पांचाळ (वय २८), सुधाकर भीमराव वाकूरे (वय ३०), विलास मधुकर वाघमारे (वय २५), संतराम जावडे (वय ४०) सर्व रहाणार शुक्लेश्वर माजलगाव असे जखमींची नावे आहेत. हे चौघे कार क्रमांक एम.एच. ४६ बी बी १७६९ ने तुळजापूर येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान ते रात्री २ वाजण्याच्या सुमारास माळेगाव (ता. केज) येथे आले असता समोरुन येणारी कोल्हापूर-हिंगोली एसटी क्र. एम.एच. १४ बी टी २५२९ ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार मधील चौघेही गंभीर जखमी झाले. बस स्थाबवून बस चालक आणि पिकांना पाणी देण्यासाठी शेतात आलेले शेतकरी यांनी मदत करुन जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीतील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर एसटी प्रवाश्यांनी पूर्ण भरलेले होती पण चालकाने प्रसंगावधान(Accident) राखल्याने सुदैवाने एसटीतील प्रवासी सुखरूप आहेत. हा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना मदत केली.