छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबादच्या देवगिरी किल्ला परिसरात मंघळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत किल्ला परिसरात वास्तव्यास असलेले अनेक जीवाणू प्राणी तसेच जुन्या वास्तू जळून नष्ट झाल्याचे समोर आले आहे. सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने आग लागली आणि आगीने किल्ल्याला वेढा दिला.
किल्ल्याच्या आजूबाजूचा (Devgiri Fort Fire)परिसर आगीने वेढला. या आगीत ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. किल्लावरील हवामहल, चांदमिनार या वास्तू देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. किल्ल्याजवळील खंदकाच्या आतील वर बाहेरील भागात देखील गवतामुळे आग लागली.
अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, पण प्रचंड आगीपुढे हा प्रयत्न तोकडा पडत आहे. तटबंदीच्या आत ज्या जुन्या इमारती वास्तू होत्या त्यांच्या लाकडांनी पेट घेतल्याने आग आणखीन भडकलीय. किल्ल्याच्या पाथथ्याशी शेकडो परिसरात वास्तू असून त्यांना देखील या आगीचा फटका बसला आहे.ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते. त्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळी आग लागली. पण आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली. ऐतिहासिक वारशाला मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती खराब होत अशून कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.