Advertisement

घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ

प्रजापत्र | Monday, 07/04/2025
बातमी शेअर करा

मुंबई : देशात घरगुती (Gas Cylinder Price)गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी ५० रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने किचनचे बजेट बिघडणार (Gas)आहे.१४.२ किलोग्रॅमचे गॅस सिलिंडरची किंमत आता ८५३ रूपये आणि उज्वला गॅस योजनेतील सिलिंडरची किंमत आता ५५३ रूपये इतकी(Gas Cylinder Price) असणार आहे.जनरल ग्राहकांसाठी दरवाढीपुर्वी १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत ८०३ रूपये होती. ती आता ८५३ रूपये झाली आहे. तर उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी गॅसची किंमत ५०३ रूपये होती ती ५५३ रूपये इतकी झाली आहे.

Advertisement

Advertisement