पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आज प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर
आता अकरा वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक आज झाली. याच्यामध्ये राज्यसमितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे. डॉ राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती आहे. तर समितीचा शासनाचा (dinanath hospital)अहवाल आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने रुग्णलाय दोषी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चाकणकर (rupali chakankar)म्हणाल्या, हॉस्पिटल नक्कीच जबाबदार आहे. त्यांची चूक मोठी आहे. भिसे यांचा रक्तस्त्राव झाला तर उपचार केले नाहीत. सूर्या रुग्णालयाकडून तनिषा भिसे यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या नावात धर्मादाय हा उल्लेख असणं गरजेचं असते. मात्र दीनानाथ रुग्णालयाच्या बाबतीत ते दिसून आले नाही. महिलेला योग्य ते उपचार (pregnant woman) न दिल्याने रुग्णलाय दोषी आहे. त्यांनी कुठलाही धर्मादायचा नियम पाळलेला नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई होणार आहे. दीनानाथ रुग्णालयाने या रुग्णाच्या बाबतीत अथवा धर्मादायचेही कोणतेही नियम पाळले नाहीत. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते रुग्णाला मिळालं नाही. समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.