Advertisement

अंबाजोगाईत दिवसाढवळ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

प्रजापत्र | Tuesday, 01/04/2025
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.१(प्रतिनिधी): शहरात (Ambajogai) एका तीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आला असून त्याचा उपचारादरम्यान (दि.१) मंगळवार रोजी सकाळी मृत्यु झाला आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं(Crime) वातावरण पसरलं आहे.

 

  अंबाजोगाईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत तरुणाचा मृत्यु झाला आहे. (Ambajogai)राजकुमार साहेबराव करडे (वय ३०)रा. गवळीपुरा, अंबाजोगाई असे मृत तरुणाचं नाव आहे.पोखरी रोडवरील सारडा नगरीजवळ (दि.१)मंगळवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी राजकुमारवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार करडे यांना तातडीने स्वाराती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, (Crime)उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर वार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत, असे उपचार करण्याऱ्या डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात (Ambajogai)भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement