गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा शहरात मंगळवारी सकाळी एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलासह एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही(Gujarat factory Blast) दुर्घटना घडली. स्फोटामुळे कारखान्याचा स्लॅब कोसळला, ज्यामुळे अनेक लोक आत अडकले.
डीसा ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितले की, (Gujarat factory Blast) शहराजवळील कारखान्याचे काही भाग कोसळले आणि त्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे आग लागली, ज्यामुळे अनेक कामगार अडकले.दरम्यान, बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,, "आज सकाळी डीसा येथील औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.(Gujarat factory Blast) पोहोचला आणि आग आटोक्यात आणली. अनेक जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला."आग इतकी भीषण होती की गोदामाचा ढिगारा २०० मीटर अंतरापर्यंत उडून गेला. मृत कामगारांचे मृतदेह दूरवर विखुरले होते. आगीच्या घटनेनंतर जेसीबीच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
या दुर्घटनेत मृत्युमुखींची संख्या वाढू शकते कारण अपघाताच्या वेळी २० हून अधिक लोक उपस्थित असल्याचा संशय आहे. आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ४ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार गोदामात फक्त साठवणुकीची परवानगी होती, तर गोदामाच्या नावावर फटाक्यांचा कारखाना सुरू होता. बॉयलरमुळे गोदामात मोठी आग लागल्याचा दावा केला जात आहे. गोदामात स्फोट झाल्यानंतर मालक पळून गेला असून आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.