Advertisement

२६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचे त्यांच्या जन्मगावी स्मारक उभारणार

प्रजापत्र | Saturday, 29/03/2025
बातमी शेअर करा

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी (Mumbai) भयानक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मुंबई (Mumbai police)पोलिसातील उपनिरीक्षक, अशोक चक्र पुरस्कार विजेते तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी शहिद झाले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने म्हत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने ओंबळे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास (gramvikas)विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हे स्मारक (Tukaram Omble) तुकाराम ओंबळे यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील केडांबे येथे बांधले जाईल. यासाठी १३.४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या मंजूर रकमेचा पहिला हप्ता, २.७० कोटी रुपये (२०%) शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही स्पष्ट केले आहे.
 

Advertisement

Advertisement