Advertisement

वाळूची चोरटी वाहतूक करताना टेम्पो पकडला 

प्रजापत्र | Friday, 28/03/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२८(प्रतिनिधी):सुरुमगाव (Majalgaon)शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच(Crime) (दि.२७) गुरुवार रोजी कारवाई करत ६,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

जिल्हाभरात (Beed)अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरु आहे.त्यातच माजलगाव तालुक्यातील सुरुमगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैध (Beed police)वाळूची वाहतूक करताना अज्ञात चालकावर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी (दि.२७) गुरुवार रोजी कारवाई केली यात एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो अंदाजे किंमत ६,००,००० रुपये व दीड ब्रास वाळू अंदाजे किंमत ९,००० रुपये असा एकूण ६,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक पोलिसांना पाहताच तेथून पसार झाला.या घटनेचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement