अंबाजोगाई दि.२६(प्रतिनिधी):अंबाजोगाई (Ambajogai)येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चौक रोडने एक इसम मोटार सायकलवर विदेशी दारु विकणाऱ्यासह मटका घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (दि.२६) बुधवार रोजी रात्री कारवाई (Beed police)केली आहे.या दोन कारवाईत ७४,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबाजोगाई (Ambajogai) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चौक रोडने एक इसम मोटार सायकलवर विनापरवाना बेकायदेशिररित्या विदेशी दारु विक्री करण्याच्या हेतुने वाहतुक करुन घेऊन जात आहे अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेला (Lcb) मिळाल्याने त्यांनी मोंढा जाणाऱ्या कमानीजवळ सापळा रचला असता त्याठिकाणी संशयीत दुचाकी आली त्यास थांबवुन पाहणी केली असता अवैध दारु वाहतुक करीत असताना एक इसम मिळुन आला दिलीप बालाजी जाधव (वय ३४)रा.सदर बाजार अंबाजोगाई त्याच्याकडून दारु व दुचाकी असा एकुण ७२,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर गु.र.नं १३६/२०२५ कलम महाराष्ट्र (Beed police)दारुबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे तसेच आझाद चौक या ठिकाणी चोरुन लपुन मटका घेणाऱ्या ईसमांस पकडुन त्याचे कडुन नगदी २१०० रुपयांचा व कल्याण मटका जुगाराचे साहीत्य जप्त करुन शेख रईस शेख सलाउद्दीन (वय २८) रा सदर बाजार अंबाजोगाई हा व मटका मालक चाँद गवळी या दोघांविरुद्ध अंबाजोगाई शहर(Ambajogai) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरील कारवाई नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड,चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार विकास राठोड, मारोती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, विष्णु सानप, नितीन वडमारे यांनी केली आहे.