गेवराई दि.२३(प्रतिनधी): तालुक्यातील(Georai) नवोदय विद्यालय गढी येथील शाळेच्या गेटसमोरून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गेवराई पोलिसांना माहिती मिळताच (दि.२२) शनिवार रोजी कारवाई करत १७,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील(Beed) वाळू माफियांवर लगाम लावण्यासाठी पोलिसांच्या कारवाईचा सपाटा सुरू असताना देखील अवैध वाळूची वाहतूकथांबण्याचे नाव घेत नाही. गेवराई तालुक्यातील गढी येथील नवोदय विद्यालय शाळेच्या गेटसमोरून अवैध वाळूची वाहतूक (Crime)करताना फारूक यासिन शेख (वय २९) रा.मुदापरी ता.गेवराई याच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.२२) शनिवार रोजी कारवाई केली. यात हायवा क्र.एमएच १४ जे आय ९०११ अंदाजे किंमत १७,००,००० तसेच सहा ब्रास वाळू अंदाजे किंमत ३६००० असा एकूण १७,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई गेवराई पोलीस करत आहेत.