मुंबई : ‘‘संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पूर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध फ्रंट व सेल राज्यप्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष (NCP organises 'Maharashtra Mahotsav)त्यांनी शुक्रवारी (दि.२१) घेतली. महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारे कार्यक्रम या ‘महाराष्ट्र महोत्सवा’त आयोजित करावेत, अशा (Sunil Tatkare)
तटकरे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या भूमिकेतून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र महोत्सव’ (Maharashtra Mahotsav) निमित्त मुंबईत १ ते ३ मे दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती या प्रशासकीय विभागात स्थानिक मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आणि ओळख अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.