बीड जिल्ह्यातील (Beed)मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा माजी उपसरपंचाच्या हत्येने हादरला आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडे गावात किरकोळ वादातून शिंदे गटाच्या (Murder case)माजी उपसरपंचाची तिघांनी धारदार शस्राने हत्या केली आहे. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी (Police)पोलिस पथके रवाना झाली आहेत.
युवराज सोपान कोळी (३५) असे हत्या झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. आज शुक्रवार( दि.२१) सकाळी आठच्या सुमारास अज्ञात तिघांनी त्यांच्या छातीत धारदार शस्राने वार करुन (Crime)त्यांचा निर्घुण खून केला. युवराज हे आईवडिल, तीन मुलं व पत्नी यांच्यासह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपलं कुटुंब चालवत होते. युवराजचे गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये काही जणांशी किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काही शेतकऱ्यांच्या समोरच ही घटना घडली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली मात्र तोपर्यंत मारेकरी हत्या करुन पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. (Murder case)यावेळी मयत कोळी यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.दरम्यान , डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच जळगाव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवराज यांच्या हत्येविषयी बोलताना दु:ख व्यक्त केलं. तसेच संबधितांवर तातडीने योग्य ती कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया दिली आहे.