पुणे: पुण्याचं (Pune)आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये मिनी बसला भीषण आग लागून त्यात चार जण होरपळ्याची घटना घडली होती. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र,पोलिसांच्या तपासात(Accident) काही भलतंच समोर आलं आणि संपूर्ण राज्य हादरलं. त्या मिनी बसला आग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर चालकानेच आग लावली होती. कंपनीतील कर्मचारी त्रास देत असल्याने त्याने गाडीला आग लावल्याची माहिती आहे. (Hinjawadi) याप्रकरणी मिनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर (वय ५६) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलं आहे.
या भीषण दुर्घटनेत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण ( वय ४०) (सर्व मृत राहणार पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.जनार्दन हंबर्डीकर हा व्योमा ग्राफिक्स कंपनीत मिनी बस चालवण्याचं काम करायचा. कंपनीने दिवाळीस दिवाळीत कमी पगार देण्यात आला होता. तसेच, कंपनीतील कर्मचारी त्याला अपमानास्पद वागणूक देत होते. हे त्याच्या डोक्यात बसलं होतं. त्यामुळे या खुन्नसमध्ये त्याने बदला घेण्याचा निर्णय(Bus fire) घेतला.कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने याचा बदला घेण्यासाठी त्याने १२ जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यात इतर कर्मचारी बचावले गेले. चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेन्झिन(Hinjawadi) केमिकल आणि काही कापडी चिंध्यांचा वापर करत ही मिनी बस पेटवली. आगीचा भडका उडताच त्याने आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उडी घेतली. हे समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.
बसला आग लागल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनीही बसमधून खाली उड्या घेतल्या. मात्र, मागच्या बाजुला बसलेले कर्मचारी बसमधून बाहेर पडू शकले नाही आणि आगीत होरपळून त्यांचा जीव गेला. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पण, ज्या कर्मचाऱ्यांवर जनार्दन हंबर्डीकरचा रोष होता ते तीन कर्मचारी या घटनेत वाचले. ज्या कर्मचाऱ्यांनी जनार्दन हंबर्डीकरला त्रास दिला होता, ज्या कर्मचाऱ्यांना त्याला मारायचे होते, ती तीन कर्मचारी या घटनेत वाचले आणि ज्यांचा याप्रकरणाशी तेवढा काही संबंध नव्हता त्यांचा यात नाहक बळी गेला. या घटनेने चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.