मुंबई दि.२८ - ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. आज सकाळी 11.30 वाजता त्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यानुसार त्या आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊ शकतात. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहेत.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर काँग्रेसही असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तसंच ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.
बातमी शेअर करा