Advertisement

मस्साजोगमधील अवादा कंपनीच्या केबलची चोरी

प्रजापत्र | Wednesday, 19/03/2025
बातमी शेअर करा

केज दि.१९ (प्रतिनिधी) : तालुक्यातील (Kaij)मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामतून ११ लाख २६ हजार रुपयाच्या कॉपरच्या केबलची चोरी झाली आसून (Crime)सहाय्यक स्टोअर मॅनेजर आशुतोष जयराम सिंग यांच्या फिर्यादी वरून मंगळवार (दि.१८) रोजी अज्ञात(Police) चोरट्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

केज तालुक्यातील(Kaij) पवनचक्क्या उभारणीचे काम करणाऱ्या अवादा ऍनर्जी कंपनीच्या मस्साजोग शिवारातील गोदामतून सोमवारी (दि.१०) च्या रात्री साडे सहा ते मध्यरात्री १२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी ११लाख २६ हजार रुपये किमतीचे कॉपरचे केबल चोरून नेल्याची घटना घडली आसून अवादा ऍनर्जी कंपनीचे सहाय्यक (Police)स्टोअर मॅनेजर आशुतोश जयराम सिंग यांच्या फिर्यादीवरून मंगळवार (दि.१८) रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आसून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement