Advertisement

 सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतल्या

प्रजापत्र | Wednesday, 19/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : नासाचे अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams)आणि बुच विल्मोर हे केवळ ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांची पृथ्वीवर परत येण्याची प्रक्रिया २८६ दिवसापर्यंत लांबली. गेल्या ९ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते. आज पहाटे ते दोघेही पृथ्वीवर परतले.

बोईंग स्टारलायनरवरून ५ जून २०२४रोजी अंतराळात गेलेल्या या दोघांनी आज स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर पुनरागमन केले. त्यांच्यासोबत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्बुनोव्ह हे देखील होते.अंतराळयानाने परतीच्या प्रवासादरम्यान आपल्या पॅराशूटद्वारे फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले. नासाच्या पथकाने यानाचे हॅच उघडले आणि अंतराळवीरांना बाहेर येण्यासाठी मदत केली. (Sunita Williams)सुनिता विलियम्स यानातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून आनंद व्यक्त करताना दिसल्या. याऐतिहासिक मोहिमेचे सर्व जगातून कौतूक होत आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. वी नारायणन यांनी X वर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) विस्तारित मोहिमेवर यशस्वीपणे कार्य करून सुरक्षित परतलात, हे अतिशय गौरवशाली आहे. नासा, स्पेसएक्स आणि अमेरिकेच्या अवकाश संशोधनातील योगदानाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तुमची जिद्द आणि समर्पण जगभरातील अवकाशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.

Advertisement

Advertisement