Advertisement

 फार्मर आयडी कार्डसाठी ५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

प्रजापत्र | Wednesday, 19/03/2025
बातमी शेअर करा

अहिल्यानगर :  शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू(Farmer id) करण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत (Ahilya Nagar) अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

 

केंद्र व राज्य सरकारकडून (Ahilya Nagar)शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना सुरू करण्यात आलेली आहे.जिल्हा प्रशासनाला १५ लाख २२ हजार ५८१ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी (Farmer id)तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.शासकीय योजनांचा लाभमिळण्यासाठी 'अॅग्रीस्टॅक' या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. (Farmer)शेतकऱ्यांनी जवळच्या (Csc)सीएससी सेंटरमध्ये फार्मर आयडीसाठी अर्ज करावेत.नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात येत आहेत.पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी,पीक विमा, कृषी विभाग यांत्रिकीकरण, थेट लाभहस्तांतरण, (Pik vima)पीक कर्ज मिळवण्यासाठी ओळखपत्राचा उपयोग होणार आहे.

 

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे
फार्मर आयडीसाठी आधार कार्ड, सात बारा उतारा गट क्रमांक, नमुना ८ अ खाते उतारा क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement