Advertisement

प्रवाशाच्या बॅगवर चोरट्यांचा डल्ला 

प्रजापत्र | Wednesday, 19/03/2025
बातमी शेअर करा

 केज दि.१९ (प्रतिनिधी):शहरातील (Kaij)बस स्थानकासमोरुन तिरुपती ट्रव्हल्सच्या डिक्कीमध्ये ठेवलेली बॅग अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.१८) मंगळवार रोजी सकाळी ०५.३० च्या सुमारास घडली आहे.यात २,५८,६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास(Crime news)केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि,(Beed)जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून (Kaij)चोरी,लूटमार,घरफोडीच्या घटना समोर येत असून चोरांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.केज शहरातील बस स्थानकासमोरुन मायादेवी लक्ष्मणदास वैष्णव (वय ५५) रा.राजस्थान ह.मु मंगळवार पेठ आंबाजोगाई ह्या तिरुपती ट्रव्हल्स गाडी क्र एमएच ०४ एल क्यु  ९८४५ ने प्रवास करत असताना ट्रव्हल्सच्या डिक्कीमध्ये ठेवलेली पिस्ता(Crime news) कलरची बॅग अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.१८) मंगळवार रोजी सकाळी ५. ३० च्या सुमारास घडली असून यात ७ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस,१० भार वजनाचा चांदीचा राजवाडी करंड,१० भार वजनाचे चांदीचे चैन ,१० भार वजनाचे चांदीचे वाळे,चांदीचा सिक्का,नगदी सात हजार (Beed police)रुपये असा एकूण २,५८,६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला.मायादेवी वैष्णव यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement