Advertisement

केज तालुक्यात आठ विद्युत मोटारी चोरीला 

प्रजापत्र | Tuesday, 18/03/2025
बातमी शेअर करा

केज दि.१८ (प्रतिनिधी):तालुक्यातील(Kaij) हातगाव शिवारातील चार शेतकऱ्यांच्या आठ पाणबुडी मोटर (Crime news)अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.१३) गुरुवार रोजी रात्री ८ ते २ च्या दरम्यान घडली असून १,४००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती(Beed) अशी कि,केज तालुक्यातील हातगाव येथील महादेव शिवाजी वायबसे (वय ४५)रा.हातगाव ता.केज (Kaij)यांच्या शेतातील दोन पाणबुडी मोटर किंमत ३०,००० व अमोल यादव यांच्या तीन लक्ष्मी लाडा कंपनीची पाणबुडी मोटर किंमत ३९,००० तसेच हनुमान चांगदेव हागे २५,००० बाबासाहेब महादेव वायबसे यांची एक पाणबुडी मोटर किंमत  १०,००० असा एकूण अंदाजे १०,४००० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास(Crime news) केल्याची (दि.१३) गुरुवार रोजी रात्री ८ ते २ च्या दरम्यान घडली असून महादेव शिवाजी वायबसे यांनी (दि.१७) सोमवार रोजी दिलेल्या फिर्यादी वरून(Beed Police)अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास केज पोलीस करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement