Advertisement

 दुचाकी आडवी लावत चौघांनी लुटले 

प्रजापत्र | Tuesday, 18/03/2025
बातमी शेअर करा

केज दि.१८ (प्रतिनिधी): तालुक्यातील डिगोळआंबा (Kaij) शिवारात अंकुर फाटा येथे अज्ञात चोरटयांनी ४० वर्षीय इसमास चार जणांनी (Crime news)दुचाकी आडवी लावून भर रस्त्यात लुटल्याची घटना (दि.१७) सोमवार रोजी घडली असून अज्ञात (Beed police)चार चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

                   जिल्हयात (Beed)चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना पाहावयास मिळत आहे.केज (Kaij) तालुक्यातील चक्रधर गणपत थोरात रा.बंनकरजा ता.केज (वय ४०) हे दुचाकीवरून आंबासाखर कारखाना येथून लोखंडी सावरगाव मार्गे केजकडे जात असताना डिगोळआंबा शिवारात अंकुर फाट्याजवळ रोडवर दोन काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी (दि.१७) सोमवार रोजी १०.३० वा.गाडी (Crime news)आडवी लावत बळजबरी करत खिशातील रोख रक्कम १,२०,००० रुपये तसेच खिशातील मोबाईल असा एकूण १,२०,००० रुपयांचा ऐवज लंपास करत(Beed police) अज्ञात चोरटे पसार झाले असून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करत आहेत.  
 

Advertisement

Advertisement