मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री (Ajit pawar)अजित पवार यांनी बीडच्या विकासाच्या दृष्टीने विधीमंडळात मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून घेतलेल्या पहिल्या डीपीसीच्या बैठकीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत मागणी केली होती. त्यादृष्टीने आता पावलं टाकण्यास सुरुवात झाली आहे.
अजित पवारांनी विधीमंडळामध्ये बोलतान बीडच्या(Beed) विमानतळाबाबत (Airport)घोषणा केली. जिल्हाधिकारी बीड यांनी राज्य शासनाला तसा प्रस्ताव पाठवला असून भूसंपादनाची प्रक्रिया आणि राज्यासह केंद्र सरकारची मंजुरी याबाबचं काम वेगाने सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले. काहीही झालं तरी(Beed) बीडमध्ये किमान तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी झाली पाहिजे, असं ते म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बीडच्या विमानतळाबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी विधीमंडळात सांगितलं. पवारांनी विमानतळाची (Airport)घोषणा केल्यानंतर परळी विधानसभेचे (Dhananjay Munde)आ.धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला असल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल, असं मुंडे म्हणाले.